fbpx

अंजनी नदीच्या किनाऱ्यावर आढळला तरुणाचा मृतदेह

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२१ । एरंडोल पोलीस स्टेशन हद्दीत आज दि.२४ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जवखेडा रोड विखरण शिवार येथे अंजनी नदीच्या किनाऱ्यावर वीस ते पंचवीस वर्षाच्या तरुणाचा मृतदेह पाण्यात बुडून फुगलेल्या व कुजलेल्या स्थितीत आढळुन आला.

याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन तर्फे मिळालेली माहिती अशी की मयत इसमाने उथळ पाण्यात उतरण्यापूर्वी लाल रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट किनाऱ्यावर काढून ठेवलेली मिळून आली.आजूबाजूला चौकशी केली असता सदर ठिकाणी खेकडी पकडण्यासाठी लोक येत असतात असे समजले.एरंडोल पोलीस स्टेशन तर्फे प्रथम दर्शनी चौकशीत घातपाताचा प्रकाराची शक्यता वाटत नसल्याचे सांगण्यात आले.

mi advt

दरम्यान एरंडोल पोलिसांतर्फे आजूबाजूच्या सर्व खेड्यांवर तसेच एरंडोल शहरात  चौकशी केली परंतु अद्याप मयताची ओळख पटली नाही. मयताचे किनाऱ्यावर मिळून मिळून आलेले कपडे है लाल रंगाचा फुल शर्ट व निळ्या रंगाची जीन्स असून मयत इसमाबाबत माहिती मिळाल्यास कृपया संपर्क साधावा असे आवाहन एरंडोल पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,पंकज पाटील,अनिल पाटील व काशिनाथ पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज