fbpx

पाटणादेवी जंगलात आढळला गुराख्याचा मृतदेह ; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील गणेशपुर येथील 50 वर्षीय गुराख्याचा मृतदेह काल पाटणादेवी जंगलात हात पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणी आज चाळीसगाव ग्रामीण पोलिसात त्यांचा मुलगा निलेश पाटील यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील गणेशपुर येथील नाना ऊर्फ ज्ञानेश्वर संतोष पाटील( वय 50) हे पाटणादेवी अभयारण्यात गुरे चारण्यासाठी जात असत आणि ते दोन ते तीन महिने जंगलामध्येच राहत असत. या दरम्यान काल त्यांचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला.

ही माहिती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृताचे हात पाय बांधलेल्या अवस्थेत आणि संशय व्यक्त होत असल्यामुळे आज मयताचा मुलगा निलेश पाटील यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज