fbpx

जळगाव एमआयडीसी हद्दीत आढळून आलेल्या ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२१ । जळगाव शहरातील एमआयडीसी हद्दीत रस्त्यावर एका ६० ते ६५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान, या मयत व्यक्तीची ओळख पटली असून  शाहू नगरातील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले आहे. दत्तात्रय गोपाळराव मालसुरे (वय-६०) असे या मयताचे नाव असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, शहरातील एमआयडीसी हद्दीत रस्त्यावर  एका ६० ते ६५ वर्षीय व्यक्तीचा अत्यवस्थ अवस्थेत पडलेल्या रूग्ण आढळून आले होते. त्यावेळी एका रिक्षाचालकाने त्याला उचलून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले होते. सुरूवातीला ओळख पटलेली नव्हती. परंतू एका तासानंतर त्या मयताची ओळख पटली.

mi advt

दत्तात्रय  मालसुरे  असे मयत वृध्दाचे नाव आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संदीप धनगर करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज