fbpx

धक्कादायक : घराच्या छतावर आढळले लचके तोडलेले मृत अर्भक

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२१ । पारोळा शहरात कंमरेपासून पाय नसलेला स्थितीत एका नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

याबाबत असे कि, शहरातील हवलदार मोहल्ला परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरावरील छतावर कंमरेपासून पाय नसलेला स्थितीत एका नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान, या बालकाचे पालक कोण? याबाबत अद्यापही पत्ता लागू शकला नसला तरी घराच्या छतावर त्याला कुणी आणून टाकले? कमरे खालचे शरीर छतावर आणून टाकण्यापुर्वी तुटलेले होते की छतावर कुत्र्यांनी त्याचे लचके तोडले?असा प्रश्न उपस्थित केला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज