जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२२ । जामनेर-बोदवड रस्त्यावरील कांग नदीपात्रात शुभम नंदू माळी याचा मृतदेह आढळून आला होता. जवळ दुचाकी देखील पडली होती. दरम्यान, हा अपघातात नसून उसनवारीच्या रुपयांवरून मामेभाऊ पवन अशोक माळी (रा. बोदवड) याने त्याचा खून केल्याची कबुली दिली आहे. शुभमला कांग नदीच्या पुलावरून फेकून दिल्यानंतर अपघात दाखवण्यासाठी त्याची दुचाकी खाली फेकली. तेरा दिवसांनंतर या खुनाचा उलगडा झाला.
काय आहे नेमकी घटना?
३१ जानेवारी रोजी सकाळी शुभमचा मृतदेह जामनेर-बोदवड रस्त्यावरील कांग नदीपात्रात आढळून आला. जवळच दुचाकीही पुलाखाली पडली होती. यामुळे खळबळ उडाली हाेती. या युवकाची हत्या झाल्याचे प्रथम दर्शनी समजत असले तरी घटनेबाबत ठोस पुरावे घटनास्थळी न आढळल्याने जामनेर पोलिस ठाण्यात या प्रकरणी केवळ अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली हाेती.
दरम्यान, गुजरात येथून ट्रक चालवून येत असलेल्या शुभमने धुळ्यातून कुटंुबीयांना फाेन केला होता. मध्यरात्री घरी येईन, असा निरोप त्याने दिला होता; परंतु, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह मिळाला. सुरुवातीला हा अपघात असल्याचे दिसून येत होते. त्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मृत तरुणाच्या मामेभावाला ताब्यात घेतले आहे. तर आपणच शुभमचा खून केल्याची कबुली पवन माळी याने पाेलिसांना दिली आहे.
शुभम माळीचा मामेभाऊ पवन अशोक माळी यानेच पैशाच्या वादातून खून केल्याचे समोर आले. त्यानंतर संशयित पवन माळी याला बाेदवड तालुक्यातील नाडगाव येथून रविवारी दुपारी अटक करण्यात आली.
हे देखील वाचा :
- जळगावकरांचे प्रचंड आभारी आहे; “हॅट्ट्रिक” साधून विजयी झाल्यानंतर आ. राजूमामांची प्रतिक्रिया
- जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटीलांचा पुन्हा विजय ; विरोधकांना चारली धूळ
- जळगाव शहरातून राजूमामा भोळे यांची विजयी हॅट्रिक
- महाराष्ट्र्रात पुन्हा महायुतीचे सरकार; ‘या’ 5 मुद्द्यांमुळे मिळाला विजय..
- जळगाव जिल्ह्यात मविआला धोबीपछाड! सर्वच ११ जागांवर महायुतीचा विजय निश्चित