मोनाली कामळस्कर फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२१ । मोनाली कामळस्कर फौंडेशनच्या वतीने दि.२३ एप्रिल रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

जळगांव शहरात या करोना महामारीत रक्ताची खूपच टंचाई निर्माण झाली होती. तसेच फौंडेशनचे उपाध्यक्ष  विजय नारायण वाणी यांच्या वाढदिवसानिमित्याने फाउंडेशन ने पुढाकार घेऊन २३ एप्रिल रोजी रेडक्रॉस सोसायटी जळगांव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

या रक्तदान शिबिरात 35 समाज बांधवांनी व मित्र परिवारानी रक्तदान केले. शिबिर चालू असताना डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी येऊन या करोना महामारीत रक्तदानाचे महत्व समजावू सांगितले. तसेच समाजाचे माजी अध्यक्ष उमाकांत वाणी व मुकुंदराव वाणी हे सुद्धा हजर होते

हा कार्येकर्म यशस्वीते साठी नंदकिशोर कामळस्कर, सुधाकर वाणी, विजय वाणी, अनंत कश्यप, राजेश वाणी, राहुल हरणे, वासुदेव वाणी, शंकर वाणी, अजय कामळस्कर तसेच रेडक्रॉस सोसायटीचे कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले. शेवटी संस्थेचे संस्थापक नंदकिशोर कामळस्कर यांनी सर्वांचे आभार मानले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज