मन्सूर पिंजारी बिरादरी, आझाद फाऊंडेशनतर्फे रक्तदान शिबिर

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२१ ।  मंसूरी पिंजारी समाजाचे समाजरत्न अहमद पिंजारी यांच्या स्मरणार्थ आझाद फाउंडेशन व जिल्हा मंजुरी पिंजारी बिरादरी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

रक्तदान शिबिराच्या आरंभ सचिन मिस्त्री यांच्या रक्त दाराने झाला तसेच मंसूरी पिंजारी समाजाचे व इतर समाजाच्या नागरिकांनी देखील या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले. यावेळी भुसावळचे माजी नगराध्यक्ष पिंजारी यांनीही रक्तदान केले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी सभासद शहारुख पिंजारी, इम्रान पिंजारी ,महमूद पिंजारी, ताईमुर पिंजारी, अश्फाक शेख, निसार पिंजारी यांनी परिश्रम घेतले.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी उपमहापौर भुषण पाटील, नगरसेवक कैलास सोनवणे, सुरेश सोनवणे, अतुल बारी व इतर मान्यवर उपस्थित होते

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -