⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

जीवे मारण्याच्या धमकीनंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया ; वाचा काय म्हणाले..

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२४ । भाजपच्या वाट्यावर असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आल्यामुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, जीवे मारण्याच्या धमकीनंतर एकनाथ खडसे यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सोमवारी सायंकाळापासून मंगळवारी सायंकाळपर्यंत साधारण ५ वेळा मला जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले. “फोन करणाऱ्या व्यक्तीने दाउद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्या नावाने मला धमकी दिली. आपकी कोई खैर नही, आपको मार देंगे, आपको मारना है, असं मला म्हटलं. सुरुवातीला मला वाटलं की, कुणी खोडसाळपणा करत असेल. पण त्यानंतर फोन येण्याचं प्रमाण वाढल्याने मी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे”, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम तुम्हाला मारणार आहे, असे फोनवरून धमकी देणाऱ्याने खडसेंना सांगितले. पहिल्यांदा असा फोन आल्यानंतर खडसेंनी त्याकडे दुर्लक्ष केले. पण त्यानंतर त्यांना पुन्हा फोन आले. तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही काहीच केले नाही. तुम्हाला ही लोक मारणार आहेत, अशी धमकी अज्ञात व्यक्तीने खडसेंना दिली.

दरम्यान, एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याच्या धमकीची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील खडसेंना कुख्यात गुंड आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून धमकी देण्यात आली होती. खडसे यांच्या नावाने अनंत पाटील आणि सुनील पाटील या नावाच्या फेसबुक अकाउंटवरून ठार मारण्याची धमकी असल्याची पोस्ट एका व्यक्तीने फेसबुकवर टाकली होती.

जळगावात एमआयडीसीत केमिकल कंपन्यांना भीषण आग ; अनेक कर्मचारी अडकल्याची भीती

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२४ । जळगाव शहरातील एमआयडीसीमधील मोरया ग्लोबल कंपनीसह दोन केमिकल कंपन्यांना भीषण आग लागल्याची घटना आज १७ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता सुमारास घडली. यावेळी कंपनीतून विविध प्रकारचे स्फ़ोट होत असल्याने परिसरामध्ये भयाचे वातावरण आहे. दरम्यान, दोन कंपन्यामध्ये ही आग भडकली असून आठ ते दहा जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

घटनेत करण जगबिर संधू (वय २०, रा. अमरावती) आणि उमेश जगदीश कोळी (वय ३० रा. यावल) हे दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत असे की, जळगावातील एमआयडीसीमधील मोरया ग्लोबल कंपनीसह दोन केमिकल कंपन्यांना भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी १७ रोजी घडली. घटनास्थळी जळगाव महानगरपालिका व इतर अग्निशमन दलाचे बंब दाखलं झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल असून नागरिकांच्या मदतीने मदत कार्य करीत आहेत. दरम्यान आग ही शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून दोन्ही कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

कंपनीत आठ महिला व काही कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यात जळगाव तालुक्यातील आव्हाने गावातील तीन जणांचा समावेश आहे. त्यापैकी मंगल पाटील याला बाहेर काढण्यात आले आहे. समाधान नारायण पाटील हा युवक मध्ये अडकला आहे.

दाऊद, छोटा शकील गँगकडून नाथाभाऊंना जीवे मारण्याची धमकी ; राजकीय वर्तुळात खळबळ

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२४ । सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आले आहे. चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन त्यांना धमकी आली असून ही धमकी कुख्यात गुंड आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान,याप्रकरणी एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून एकनाथ खडसे यांना धमकी आली होती. १५ आणि १६ एप्रिल रोजी हे फोन आले होते.

काय दिली धमकी
छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम तुम्हाला मारणार आहे, असे धमकी देणाऱ्याने पहिल्यांदा फोनवरुन सांगितले. त्यानंतर खडसे यांनी तो प्रकार गंभीरतेने घेतला नाही. त्यानंतर दुसऱ्या फोनवरुन पुन्हा फोन आला की तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही काहीच केले नाही. तुम्हाला ही लोक मारणार आहेत. चार ते पाच वेळा असे फोन आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, सदर नंबर ट्रेस केल्यानंतर एक अमेरिका आणि एक उत्तर प्रदेशातील असल्याचं दिसत आहे. याबाबत पोलीस स्टेशला मी तक्रार दाखल केली आहे. पोलीस आता या प्रकरणी चौकशी करतायत. तपासात काय समोर येतं ते पाहावं लागेल, असंही एकनाथ खडसेंनी यावेळी सांगितलं.

दोनच दिवसात सोनं 1200 रुपयांने महागले ; आता जळगावात एका तोळ्यासाठी मोजावे लागतंय इतके रुपये..

0

जळगाव न्यूज | 17 एप्रिल 2024 | जागतिक नकाशावर अजून एका युद्धाचे सावट दिसत आहेत. इराण आणि इस्त्राईलमध्ये सुरु असलेल्या ताणतणावाचे परिणाम जागतिक बाजारावर दिसून येत आहेत. जागतिक गुंतवणूकदारांनी त्यांचा मोर्चा सोने-चांदीतील गुंतवणुकीकडे वळवला आहे. या सर्व परिस्थितीचे चटके ग्राहकांना सहन करावे लागत आहेत. जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याच्या किमतीने जीएसटीसह 75 हजार रुपयाचा टप्पा ओलांडला आहेत. तर चांदीचा दरही 83 हजार रुपयावर गेला आहे.

पहिल्या पंधरवाड्यात दरवाढीचा आलेख उंचावला होता. दुसऱ्या पंधरवाड्यातही मौल्यवान धातूंची घौडदौड सुरुच आहे. एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीने तुफान खेळी खेळली. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या आठवड्यातील दोन दिवसांत सोने दरात 1200 रुपयांची वाढ झाली आहे.

त्यामुळे जळगावात आता सोन्याचा भाव ७३ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. तर जीएसटीसह सोन्याचा तोळ्याचा दर ७५ हजार ९११ रुपयावर गेला आहे. दुसरीकडे, चांदीच्या भावात मात्र २०० रुपयांची घसरण होऊन ती ८३ हजार ३०० रुपये प्रति किलोवर आली.

या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असेल ; वाचा आजचे राशिभविष्य

0

मेष
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. आज आपण कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवू. विद्यार्थ्यांना यश मिळेल. आज तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल. बिझनेसच्या निमित्ताने बाहेर कुठेतरी जाऊ शकता. .

वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील. कोर्टाशी संबंधित कामात यश मिळेल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा चांगली राहील. तुम्ही ठरवलेले कोणतेही काम आज पूर्ण होईल. करिअरमध्ये यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. गरजूंना मदत करा.

मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. आज काही लोकांच्या बाबतीत थोडे सावध राहा. मुलांना अभ्यासात यश मिळेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. व्यवसायात विरोधकांपासून दूर राहा. आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. लक्ष्मीची पूजा करा.

कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असेल. आज इतरांवर विश्वास ठेवणे टाळा. जवळची व्यक्ती तुमचा विश्वासघात करू शकते. तुमच्या जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचे खाणे टाळा अन्यथा नुकसानास सामोरे जावे लागू शकते. घराच्या मंदिरात तुपाचा दिवा लावावा.

सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. कुटुंबासोबत कुठेतरी जाण्याचा बेत आखू शकता. आज तुम्ही दिवसभर आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. गरजूंना मदत करा.

कन्या
कन्या राशीच्या लोकांना आज फक्त लाभ मिळतील. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवसायात लाभ होईल. आरोग्य चांगले राहील.

तूळ
तूळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. ऑफिसमध्ये तुम्हाला जबाबदाऱ्या मिळतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. वैवाहिक जीवनात येणारे अडथळे आज दूर होतील. तब्येत ठीक राहील. आज दिवसभर वादापासून दूर राहा. गाईला हिरवा चारा द्यावा.

वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक परिणाम देईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला जाण्याचा बेत आखला जाईल. आदर वाढेल. आर्थिक लाभ होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. केशराचा तिलक लावावा.

धनु
धनु राशीच्या लोकांना यश मिळेल. नोकरीशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला राहील. जवळच्या लोकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्य चांगले राहील. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. प्रियकरासाठी दिवस शुभ आहे. आज कोणताही धोका पत्करणे टाळा. घराच्या मंदिरात दिवा लावावा.

मकर
मकर राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे. प्रॉपर्टी डीलरच्या व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला राहील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. आरोग्य चांगले राहील. मंदिरात नारळ दान करा.

कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आर्थिक लाभ होईल. आज तुम्ही दिवसभर निरोगी राहाल. संपत्तीत वाढ होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. नोकरदार लोकांसाठी दिवस शुभ आहे. तुम्हाला काही चांगली बातमी ऐकू येईल. लक्ष्मी देवीची आरती करावी.

मीन
मीन राशीचे लोक आज आत्मविश्वासाने परिपूर्ण असतील. करिअरमध्ये यश मिळेल. नोकरीत बढती होईल. आरोग्याची काळजी घ्या. आज तुम्हाला कौटुंबिक समारंभात जाण्याची संधी मिळेल. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी पालकांचा सल्ला अवश्य घ्या. देवी लक्ष्मीसमोर दिवा लावा.

सर्वसामान्यांचा प्रवास आणखी महागणार! एसटीचे तिकीट दर १० टक्क्यांनी वाढणार..

0

जळगाव न्यूज | 16 एप्रिल 2024 | ऐन उन्हाळ्याच्या सुटीत गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी होत असतानाच दुसरीकडे एसटी महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला असून, त्यास मंजुरी मिळाली तर चाकरमान्यांच्या खिशाला भुर्दंड बसणार आहे.

मुंबईसह राज्यभरातून राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासी उन्हाळी सुट्यांसाठी, देवदर्शनासाठी एसटी बसने प्रवास करत असतात. तर एसटी महामंडळाकडून महसूल वाढीसाठी हंगामी भाडेवाढ केली जाते. याच भाडेवाढीनुसार, उन्हाळी हंगामातील भाडेवाढीसाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

१५ एप्रिल ते १५ जून दरम्यान ही भाडेवाढ असणार असली तरी सध्याच्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पाहता परिवहन प्राधिकरणाने निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन पुन्हा प्रस्ताव पाठविण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

डॉ. केतकीताई पाटीलांची बोदवड भाजपा कार्यालयास भेट

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२४ । बोदवड येथील भाजपा कार्यालयास भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकीताई पाटील यांनी आज सदिच्छा भेट दिली. या वेळी तालुका अध्यक्ष मधुकर राणे तालुका उपाध्यश विक्रमसिंग पाटील, बोदवड तालुका उपाध्यक्ष वैभव पाटील, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र डापसे, तालुका चिटणीस मधुकर पारधी, जिल्हा चिटणीस परमेश्वर भाऊ टिकारे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष अभिषेक झाबक, कार्यालय प्रमुख अमोल शिरपूरकर, किसान मोर्चा जिल्हा चिटणीस, गजानन वाघ, युवा मोर्चा शहर अध्यक्ष राहुल माळी, युवा मोर्चा सरचिटणीस वैभव माटे आदी उपस्थित होते.

या वेळी डॉ. केतकीताई पाटीलांनी आगामी लोकसभा निवडणुकां संदर्भात चर्चा केली. तसेच युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष अभिषेक झाबक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा शाल, पुष्पगुच्छ, पुस्तक भेट देऊन सत्कार केला.

यंदाच्या मान्सून संदर्भात हवामान खात्याचा अंदाज आला रे..! महाराष्ट्रात कसा असेल मान्सून?

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२४ । सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये सूर्य आग ओकत आहे. वाढत्या तापमानाने उकाड्यात मोठी वाढ झाली असून यामुळे नागरिक हैराण झाले. त्यातच अनेक ठिकाणी पाणी टंचाईला सामोरे जावं लागत आहे. यामुळे उन्हाळ्यानंतर नागरिक पावसाळ्याची वाट पाहतोय. मात्र यंदाचा पावसाळा कसा असेल असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रासह 25 राज्यांत चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावर्षी 8 जूनपर्यंत मान्सून येणार असून जून ते सप्टेंबरदरम्यान पावसाळा असणार असल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक एम. मोहपात्रा यांनी दिलीय.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आज सोमवारी सांगितले की, यावेळी जून ते सप्टेंबरपर्यंत मान्सून सामान्यपेक्षा चांगला राहील. हवामान विभाग (IMD) सरासरीपेक्षा 104 ते 110 टक्के पाऊस चांगला मानतो. हे पिकांसाठी चांगले लक्षण आहे. IMD ने म्हटले आहे की 2024 मध्ये 106% म्हणजेच 87 सेमी पाऊस पडू शकतो. 4 महिन्यांच्या पावसाळी हंगामासाठी दीर्घ कालावधीची सरासरी (LPA) 868.6 मिलीमीटर म्हणजेच 86.86 सेंटीमीटर आहे. म्हणजे पावसाळ्यात इतका एकूण पाऊस पडला पाहिजे.

“अल निनो कमकुवत होत आहे, मान्सून सुरू होईपर्यंत तो तटस्थ अवस्थेत प्रवेश करेल,” असे IMD चे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले. या वर्षी मान्सूनच्या दुसऱ्या हंगामात ‘ला नीना’ हवामानाची स्थिती विकसित होताना दिसत आहे. “भारतातील चांगल्या मान्सूनशी संबंधित ला नीना परिस्थिती ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे, असं IMD ने म्हटले आहे.

हवामान कार्यालयाच्या अंदाजानुसार, वायव्य, पूर्व आणि ईशान्य भारतातील काही भाग वगळता, जेथे सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे, त्याशिवाय देशातील बहुतेक भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर देशातील काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या राज्यांमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस अपेक्षितः
केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, चंदीगड, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पुद्दुचेरी, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, दादरा आणि नगर हवेली, दमण-दीव.

4 राज्यांमध्ये सामान्य पाऊस अपेक्षित: छत्तीसगड, हिमाचल, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख.
6 राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षितः ओडिशा, आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा.

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२४ । गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले. महाविद्यालयाचे प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), प्रा.ईश्वर जाधव (रजिस्ट्रार), डॉ. विजयकुमार वानखेडे (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर), महाविद्यालयातील सर्व शाखांचे प्रमुख, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. नकुल गाडगे यांनी मनोगते व्यक्त केले. माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण केले.

image
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 1

डॉ. उल्हास पाटील कृषी, अन्न तंत्रज्ञान व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय
डॉ. उल्हास पाटील कृषी,अन्न तंत्रज्ञान व कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुनमचंद्र सपकाळे तर अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. करण बनसोडे यांनी केले.