पिशवीला ब्लेड मारले : एक लाख चोरट्यांनी लांबविले

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ डिसेंबर २०२१ । शहरातील एकनाथनगर, रामेश्वर कॉलनीतील रहिवाशी देवराम बाबुलाल चौधरी (वय ७२,) यांनी पोस्टात बचत म्हणून ठेवलेले दीड लाख रुपयाची रक्कम काढून ते बँकेत भरण्यासाठी गेले असता. यांच्या पिशवीला ब्लेड मारुन एक लाख रुपये लांबविल्याचे समोर आले. ही घटना गुरुवारी दुपारी पोस्ट ऑफिसजवळ घडली. याप्रकरणी सायंकाळी पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर असे की, देवराम चौधरी यांनी बचत करून दीड लाख रुपये जमवून ते पोस्टात ठेवले होते. पैसे काढण्याची स्लीप त्यांनीआधीच घरी आणली होती.  घडली. बँकेत गेल्यानंतर हा प्रकार आधीच घरी आणली होती.नातवाकडून ही स्लीप भरल्यानंतर दुपारी ते बारा वाजता पांडे चौकातील पोस्ट कार्यालयात आले. तेथून दीड लाख काढून पिशवीत ठेवले. यावेळी तेथून बँकेत गेले. पिशवीतील पाचशे रुपयांच्या नोटांचे ५० हजाराचे तीन बंडल काढायला गेले असता.

त्यातील दोन बंडल गायब होते तर एकच बंडल त्यात होते. या प्रकाराने चौधरी यांना धक्का बसला. त्यानंतर जिल्हा पेठ पोलिसांना ही घटना कळविली. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे व सहकाऱ्यांनी पोस्ट कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, मात्र काहीच माहिती मिळाली नाही.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -