fbpx

यावल येथे भाजपच्या वतीने स्व. हरीभाऊ जावळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने विविध कार्यक्रम

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२१ । भारतीय जनता पक्षाचे सर्वप्रिय असे माजी खासदार माजी आमदार व मधुकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व शेतकरी मित्र स्व. हरीभाऊ जावळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त यावल तालुका भाजपाच्या वतीने तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावल तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिनांक १६ जून २०२१ बुधवार रोजी स्व. हरीभाऊ माधव जावळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात दिनांक १६ जुन रोजी सकाळी १o. ३० वाजता तर भालोद येथे त्यांच्या गावी सकाळी ११. ३० वाजता श्रद्धांजली कार्यक्रम होणार असुन यात स्व. हरीभाऊ यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.

mi advt

यावल तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केन्द्रावर तसेच यावल आणी न्हावी ग्रामीण रुग्णालयात तसेच फैजपुर नगर परिषदच्या दवाखान्यात रुग्णांना फळवाटप करण्यात येणार असून, तसेच यावल आणी रावेर तालुक्यात विविध ठीकाणी पावसाळ्याचे औचित्य साधुन वृक्षारोपणाचे कार्यक्रम कार्यकर्त्यांच्या स्वयंस्फुर्तीने आयोजीत करण्यात आले आहे.

कार्यक्रमास भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, मसाकाचे चेअरमन शरद महाजन, जिल्हा सरचिटणीस हर्षल गोवींदा पाटील , जिल्हा परिषदचे शिक्षण व आरोग्य सामितीचे सभापती रवीन्द्र पाटील , जिल्हा परिषदच्या सदस्या सौ. सविता भालेराव, पंचायत समितीच्या सभापती सौ.पल्लवी पुरूजीत चौधरी यांच्यासह कृउबाचे माजी सभापती वकिसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष नारायण चौधरी, जिल्हा परिषदच्या सदस्या सौ.नंदाताई सपकाळे, मसाकाचे संचालक, रावेर आणी यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक , खरेदी विक्री संघाचे संचालक हे उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे , भाजपा तालुका सरचिटणीस विलास चौधरी , उज्जैनसिंग राजपुत, भाजपा महीला आघाडीच्या तालुका अध्यक्ष विद्याताई पाटील, भाज युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सागर कोळी यांनी केले आहे.

दरम्यान भालोद येथील कार्यक्रमास माजी जलसंपदामंत्री आमदार गिरीषभाऊ महाजन, जिल्हा अध्यक्ष आमदार राजुमामा भोळे व स्व . हरीभाऊ जावळे यांचे चिरंजिव अमोल जावळे उपस्थित राहणार आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज