fbpx

आगामी सर्व निवडणूका भाजपा स्वबळावर लढणार; भाजपाच्या बैठकीत आवाहन

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२१ । आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणूका भाजपा स्वबळावर लढणार असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे आवाहन बोदवड येथे झालेल्या भाजपाच्या बैठकीत करण्यात आले. यावेळी पक्षाकडून राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा व समर्पण’ अभियानाचा आढावा घेण्यात आला.

भारतीय जनता पार्टीची बोदवड तालुक्याची ‘विस्तृत आढावा बैठक’ मंगळवार दि.५ रोजी माजी मंत्री आ.गिरिष महाजन, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, खासदार रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. बैठकीत पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटन, बुथ रचना व आगामी निवडणूक यासारख्या विविध विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

mi advt

यावेळी माजी मंत्री आ. गिरिष महाजन, खासदार रक्षा खडसे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नंदु महाजन, तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, बोदवड शहराध्यक्ष नरेश आहूजा, जेष्ठ कार्यकर्ते अनंतराव कुलकर्णी, जिल्हाकोषाध्यक्ष अनिल खंडेलवाल, तालुका सरचिटणीस अमोल देशमुख, भागवत चौधरी, महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस अणिता अग्रवाल, भाजयुमो शहराध्यक्ष अभिषेक झाबक, मांगीलाल गिल, संजय अग्रवाल, सुनील माळी, दिलीप घुले, विक्रम पाटील, अस्लम शेख, गजानन शिर्के, धनराज सुतार, उमेश गुरव, सचिन पाटील, राम आहूजा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज