fbpx

आव्हान : बंडखोरांनी राजीनामा देऊन जनतेतून निवडून यावे

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२१ । भाजपा फुटीर नगरसेवक यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये स्वतःला पांडव व भाजपा निष्ठावंतांना कौरव म्हटले आहे. पांडवांमधील नैतिकतेचा एक गुण तरी त्यांच्यात आहेत का? जर बंडखोरांमध्ये नैतिकता असती तर नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन पोट निवडणुकीत निवडून दाखवावे असे खुले आव्हान भाजप जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी दिले आहे.

त्रिपाठी यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जनतेने भाजपाच्या चिन्हावर आपणांस निवडून दिले. हे जळगावच्या जनतेला माहिती आहे की बंडखोरांचे पक्षांतराचा हेतू काय आहे, जनतेला मूर्ख समजू नये. इतकीच जर शहराच्या विकासाची आच असेल तर आपण ज्या पक्षात गेले त्या पक्षाची राज्यात सत्ता आहे व आता महानगरपालीकेत ही आहे. आपली राजकीय पत सिध्द करून १०० कोटी निधी आपण आणून आपली राजकीय पत सिध्द करावी. असे खुले आव्हान विशाल त्रिपाठी यांनी दिले आहे. तसेच आपण आता भाजपाचे नगरसेवक नाही. त्यामुळे आम्ही काय करावे हे फुकटचे सल्ले आम्हाला देऊ नये. जी बंडखोरी आपण केली ती चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर जनतेचा विश्वसघात करून केली त्यामुळे भाजपा त्यावर कायदेशीर लढा देईल. मा.न्यायालय योग्य तो निर्णय घेऊन कार्यवाही होणारच याबद्दल कोणतीही शंका नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज