fbpx

भाजपच्या फुटीर नगरसेवकांना काढले बाहेर !

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी ।  शहर मनपात महापौर निवडीप्रसंगी भाजपातून बंडखोरी करत शिवसेनेला मदत करणाऱ्या नगरसेवकांना भाजपने सोशल मीडिया ग्रुपमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

जळगाव मनपा महापौर निवडीच्या राजकीय घोळात भाजपच्या २७ नगरसेवकांनी बंडखोरी करत शिवसेनेला मदत केली होती. भाजपकडून नगरसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्याची कार्यवाही सुरू आहे परंतु भाजपने त्यांना आजच सोशल मीडिया ग्रुपमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पक्षाकडून त्या बंडखोरांना बैठकीला देखील बोलावणार नसल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज