रावेर येथे मंदिरे उघडण्यासाठी भाजपाचे शंखनाद आंदोलन

बातमी शेअर करा

राज्यातील मंदिरे खुली करावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाने तर्फे आज रावेर येथे शंखनाद आंदोलन करण्यात आले.
रावेर स्टेशनरोडवरील शनि मंदिरासमोर महाविकास आघाडी सरकार विरोधात, शंख वाजवत भारतीय जनता पक्षाच्या तर्फे आंदोलन करण्यात आले.

भाजप जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन तालुकध्यक्ष राजन लासुरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी महाआघाडी सरकारविरुद्ध जोरदार घोषणा दिल्या.

या आंदोलनात जिप सदस्य नंदकिशोर महाजन, कृऊबा संचालक श्रीकांत महाजन, पस सदस्य योगिता वानखेडे,चंद्रकांत पाटील,रावेर पिपल्स बँकेचे अध्यक्ष अँड.प्रविण पाचपोहे ,भाजप शहराध्यक्ष दिलीप पाटील, सरचिटणीस रवींद्र पाटील, अमोल पाटील, संदीप सावळे,मनोज श्रावक,नितीन पाटील,नथ्थु धांडे,विजय चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar