नारायण राणेंच्या अटकेच्या निषेधार्थ पाचोऱ्यात भाजपाचे रास्तारोको

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२१ । केंद्रीय कॅबिनेट मंत्री ना. नारायणराव राणे यांना दि.२४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका केल्याबद्दल अटक करण्यात आली. त्यानंतर त्याचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटतांना दिसत आहेत.

मंत्री राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ पाचोरा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात जारगाव चौफुली येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.तसेच ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत येथील परिसर दणाणून सोडला.

यावेळी अमोल शिंदे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधत हे सरकार तालिबान्यांप्रमाणे राज्य चालवत असून दडपशाही पद्धतीने गुन्हे दाखल करीत आहे.आज त्यांनी सर्व मर्यादा ओलांडत सूडबुद्धीने केंद्रीय मंत्री मा.ना.नारायणराव राणे यांना अटक करून लोकतंत्राची हत्याच केली आहे.या गोष्टीचा भाजपा पाचोरा-भडगाव तीव्र निषेध करून रास्तारोको आंदोलन करीत आहे.

असे अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले. याप्रसंगी शहराध्यक्ष रमेश वाणी,भाजपा व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन,तालुका सरचिटणीस गोविंद शेलार,संजय पाटील,नगरसेवक विष्णू अहिरे, तालुका उपाध्यक्ष किरण पांडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील,शहराध्यक्ष समाधान पाटील,जगदीश पाटील,गोविंद देवरे,लकी पाटील,गजानन पाटील,राहुल गायकवाड,नितु नाना,वीरेंद्र चौधरी,भैया ठाकूर, प्रशांत सोनवणे,सईद शेख,संदीप मराठे, रमेश शामनाणी,आशिष जाधव,शहाजी बावचे,पंकज पाटील,विनोद पवार,प्रशांत साळुंखे,आकाश लांडगे,तुषार चौधरी,अक्षय मांडोळे,बंटी पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -