ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपातर्फे निदर्शने

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२१ । राज्यात येत्या काही काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणुकीपूर्वी ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हाधिकार्यालय समोर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देखील देण्यात आले.

भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भारती सोनवणे, ओबीसी महानगराध्यक्ष जयेश भावसार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय महाजन, यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता.

यावेळी विशाल त्रिपाठी, उज्वला बेंडाळे राहुल वाघ, राजेंद्र मराठे, महेश चौधरी, मनोज काळे, अजित राणे, रेखा पाटील, दीप्ती शिरवाडे, रेखा वर्मा, अरुण श्रीखंडे, तृप्ती पाटील, चंदू महाले, विजय बारी, शांताराम गावंडे, अमित देशपांडे, शुभम बावा, मिलिंद चौधरी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -