भाजप छत्रपतींच्या नावे केवळ सोंग करते : गुलाबराव देवकर

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२१ । भारतीय जनता पार्टी केवळ सोंग आणि नाटक करण्याचे काम करते. निवडणूक लागल्यावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालायचा, शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे, शिवाजी महाराजांना दैवत म्हणायचे आणि त्या आधारावर मते मागायचे ते काम करतात. त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री शिवाजी महाराजांचा अवमान करीत असताना एकही भाजप नेत्याने त्याच्याविरुद्ध वक्तव्य केले नाही, अशी टीका जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून रविवारी शिवतीर्थ मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पंचामृतने अभिषेक घालण्यात आला. यावेळी गुलाबराव देवकर बोलत होते. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केले. त्यांना त्यांच्या वक्तव्यात म्हटले आहे कि, पुतळ्याच्या विटंबनाच्या लहानसहान घटना घडत असतात. हि अतिशय गंभीर बाब असून राष्ट्रवादी काँग्रेस ते कदापि सहन करणार नाही, असे देवकर यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या माथेफिरुला पाठीशी घालण्याचे काम कर्नाटकचे मुख्यमंत्री करीत आहे. भाजप सरकारच्या या कृतीचा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आम्ही निषेध करतो. पंतप्रधानांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी लाडवंजारी यांनी केली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -