महाजनांना धक्का : जामनेरात आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी बांधले शिवबंधन

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ । माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघात भाजपाला आणखी एक धक्का बसला आहे. जामनेर विधानसभा क्षेत्रातील भाजपा, प्रहार संघटना आणि इतर राजकीय पक्षातील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधले.

शिवसेना नेते खा. संजय राऊत, खा. अनिल देसाई, उत्तर महाराष्ट्र समन्वयक आ. रवींद्र मिर्लेकर यांच्याहस्ते रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलास पारकर, रावेर लोकसभा संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत सोनवणे, जिल्हा प्रमुख आ. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जामनेर विधानसभा क्षेत्रातील भाजपा प्रहार तसेच इतर राजकीय पक्षातील पदाधिकारी यांनी शिवसेना पक्ष मध्ये प्रवेश केला आहे.

यांची होती उपस्थिती

यावेळी जामनेर विधानसभा मतदार संघातून जळगाव जिल्हा उपजिल्हा प्रमुख शिवसेना डॉ.मनोहर पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील, जामनेर विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील, माजी युवासेना उपजिल्हाप्रमुख एडवोकेट भरत पवार, शिवसेना उपतालुका प्रमुख कृष्णा चोरमारे, शेंदुर्णी शिवसेना शहर प्रमुख भैया गुजर, विभाग प्रमुख मोहन जोशी, सोशल मीडिया तालुकाप्रमुख मुकेश जाधव, सोशल मीडिया उपतालुका प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यांनी केला शिवसेनेत प्रवेश

यांनी केला प्रवेश प्रहार जनशक्ती पक्षातील युवक तालुकाध्यक्ष मयूर पाटील, युवक तालुका उपाध्यक्ष मनोज सनांसे,तालुका संपर्कप्रमुख भूषण कानडजे, सागर नवनाथ बेलेकर युवक तालुका सरचिटणीस, मोरगाव येथील ग्रामपंचायत सदस्यपैकी भावसिंग जाधव, संतोष उपसरपंच जयसिंग चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य विश्राम चव्हाण, विनोद चव्हाण, अनिल चव्हाण, हिवरखेडा तवा या गावातील प्रशांत युवराज आहिरे सरपंच पती, मंगलसिंग पवार उपसरपंच, ज्ञानेश्वर जगताप आरपीआय तालुका सदस्य, जनार्दन कुमाका, संतोष पाटील, चिंचखेडा तवा येथील अमित तडवी उपसरपंच, हनीफ तडवी उपाध्यक्ष आदिवासी संघटना, वाकडी या गावातील अकबर तडवी माजी सरपंच, प्रवीण गायकवाड ग्रामपंचायत सदस्य, तळेगाव येथील दीपक पाडळसे ग्रामपंचायत सदस्य, पिंपळगाव गोलाईत येथील हरिसिंग सिसोदिया ग्रामपंचायत सदस्य, तसेच विविध संघटनेच्या पदाधिकारीपैकी कैलास दांडगे जिल्हाध्यक्ष धनगर महासंघ, जळगाव जिल्हा भूमी जनशक्ती परिवर्तन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ईश्वर चोरडिया, यांच्या सह इतर पक्षातील पदाधिकारी यांनी प्रवेश घेतला.

 

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज