भाजपा अल्पसंख्यांक युवा मोर्चातर्फे संविधान दिनानिमित्त पेढे वाटप

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२१ । संविधान दिवसानिमित्त भाजपा महानगर अल्पसंख्यांक युवा मोर्चातर्फे श्याम नगर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व संविधान उद्देशिका पत्रिकाचे पूजन भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी व माजी महापौर भाजपा उपाध्यक्ष सीमाताई भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व परिसरातील नागरिकांना पेढे, मिठाई वाटप करण्यात आली.

यांची होती उपस्थिती 

या कार्यक्रम प्रसंगी जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, माजी महापौर भाजपा उपाध्यक्ष सीमाताई भोळे, अल्पसंख्यांक युवा मोर्चा अध्यक्ष अशफाक शेख, प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर, प्रमोद वाणी, प्रभाकर तायडे, शाहिद शेख मजीद मालती ताई सोनावणे, दीपक संतोष हटकर, देवेंद्र लोंडे, राजेंद्र सोनवणे, गुड्डू सोनवणे आदी जिल्हा पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar