भाजपा महिला मोर्चा जळगावतर्फे आंदोलन

जळगाव लाईव्ह न्युज | २४ सप्टेंबर २०२१ |  कडून डोंबिवली येथील महिलेवर झालेल्या अत्याचाराविरोधात उद्धव ठाकरे यांनी मा राज्यपाल महाराष्ट्र यांना लिहलेले पत्र ची होळी करुण निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी महिला आघाडी उपाध्यक्षा उज्वला बेंडाळे यांच्या नेतृत्वात रेखाताई वर्मा, नितु परदेसी यांनी व महिला मोर्चा तर्फे “उद्धव ठकरेंच्या सरकार मध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचार” यांच्या विरोधात घोषणा देत* वसंत स्मृती, भाजपा कार्यालय येथे निषेध व्यक्त करण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी स्वतः डोंबिवली परभणी येथे दौरा करून माहिती घेतल्यास पोलीस प्रशासनाचे दुरुपयोग करून प्रकार दाबण्याचे प्रयत्न शासन करत असल्याचे निदर्शनास आले “शक्ती कायद्याची” सारखे कठोर शिक्षा कायदा चे प्रावधान द्यावे तसेच अशा घटनांच्या संदर्भात “फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना” करण्यात यावी अशी मागणी महिला मोर्चाच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे व महिला आघाडी सरचिटणीस रेखा वर्मा यांनी महिला मोर्चाच्या वतीने केली असून महाराष्ट्र शासन इकडतिकडच्या घटनांचा संदर्भ देऊन फक्त पळ काढत आहे.

महिलांवर वारंवार होणारे अत्याचार रोखण्यात अजूनही शासनाला जाग आलेली नाही व काहीही उपाययोजना करत नसल्याने केंद्र शासनाने हा कायदा आणला आहे तसेच महाराष्ट्र शासनाने या कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी महिला आघाडी अध्यक्ष या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली व कठोर नियम करून अशा अत्याचारांना उपाय योजना असा आक्रोश मोर्चा तर्फे व्यक्त करण्यात आला
महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा सारखे कठोरनियम लागू करावा व फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात यावी. सरकार योग्य उपाययोजना न केल्यास भाजपा महिला मोर्चा शांत बसणार नाही, तीव्र आंदोलन करू असे इशारा देण्यात आले

जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महिला आघाडी सरचिटणीस, रेखा वर्मा, नितु परदेसी, नगरसेविका ॲड सुचिता हाडा, निळा चौधरी, ज्योती निंभोरे, वंदना पाटील, रेखा पाटील, भाग्यश्री चौधरी, तृप्ती पाटील, शालु जाधव, विद्या सोनवणे, कोकिळा मोरे, सुरेखा चव्हाण यांच्या उपस्थित हा आंदोलन करण्यात आले असून.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज