fbpx

गुलाबराव पाटील सुपारीचोर आहेत ; निलेश राणेंची जहरी टीका

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ जून २०२१ । भाजपचे युवा नेते, माजी खासदार नीलेश राणे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर विखारी टीका केली आहे. पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील सुपारीचोर आहेत, अशी जहरी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

मराठा आरक्षण संदर्भात समाजाला एकत्र करण्यासाठी माजी खासदार राणे हे सोमवारी जळगाव दौऱ्यावर आले होते. या वेळी भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जळगाव जिल्ह्यातील वाळू चोरीच्या मुद्द्यावरून निलेश राणेंनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला.

पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील सुपारीचोर आहेत. ते सामाजिक किंवा विधायक काम करू शकत नाही. गुलाबराव एखादी युनिव्हर्सिटी किंवा स्पेस सायन्सचे सेंटर उघडणार नाही तर ते वाळूच चोरणार. त्यांची अक्कलच तेवढी आहे, अशा शब्दांत नीलेश राणेंनी गुलाबराव पाटील यांच्यावर विखारी टीका केली.

नीलेश राणे पुढे म्हणाले की, जिल्ह्यात जी वाळू चोरी सुरू आहे, ते कलेक्शन गुलाबराव पाटील यांच्यासाठीच सुरू असेल. वाळू चोरीचे हफ्ते स्थानिक आमदार आणि मंत्र्यांकडे पुरवले जातात. गुलाबराव हे आधी पानटपरी चालवायचे. तेच ना गुलाबराव. इथे पालकमंत्री आहेत सुपारीचोर. ती व्यक्ती सामाजिक किंवा विधायक काम करू शकत नाही. आता गुलाबराव काय युनिव्हर्सिटी आणणार, ते वाळूच चोरणार. यातले सगळे कलेक्शन त्यांच्याकडे जात असणार, असा आरोपही निलेश राणे यांनी यावेळी केला.

खडसेंना करमत नसेल

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सरकार मजबूत असून भाजपच्या आमदारांत प्रचंड अस्वस्थता असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यासंदर्भात बोलताना खडसेंना राष्ट्रवादीत करमत नसावे, असा चिमटा राणे यांनी घेतला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज