fbpx

‘त्या’ २७ नगरसेवकांना कोणते गाजर दिले ते लवकरच कळेल : आ.गिरीश महाजन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२१ । सरकारच्या तिजोरीत खडखडाट असून गेल्या वर्षभरात कोणत्याही योजनेसाठी पैसे देण्यात आलेले नाही. सरकार स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेत आहे.

भाजपातून बाहेर पडलेल्या २७ नगरसेवकांना पैकी अनेकांना शिवसेनेत जाऊन पश्चाताप होत आहे. ते कोणत्या भूलथापांना बळी पडले हे त्यांनाच माहिती आहे. येणाऱ्या काळात काय ते समोर येईलच, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी दिली.

विविध प्रश्नांवर माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी संवाद साधला. पत्रकार परिषदेला जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, आ.सुरेश भोळे, जि. प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी आ.स्मिता वाघ, समाज कल्याण सभापती जयपाल बोदरडे, जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.पाटील, पद्माकर महाजन, नंदू महाजन आदी उपस्थित आहेत.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt