भाजप गटनेते अमर पाटील यांचा अखेर राजीनामा मंजूर

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२१ ।  भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अमर पाटील यांनी पंचायत समिती सदस्यपदाचा दिलेला राजीनामा अखेर सभापतींनी मंजूर केला आहे.

पाटील यांनी ८ जानेवारीला दिलेला राजीनामा तीन महिने प्रशासनाकडे पडून होता. पाटील यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी भाजप नेत्यांनी केलेले प्रयत्न असफल ठरल्यानंतर सोमवारी सभापती जलाल तडवी यांनी राजीनामा मंजूर केल्याचे सांगण्यात आले.

पाटील हे पंचायत समितीत भाजपचे गटनेते होते. निर्णय घेताना त्यांना विचारात घेतले जात नव्हते. एक वरिष्ठ नेताच कारभार चालवत असल्याने कंटाळून त्यांनी राजीनामा दिला. मध्यंतरी सभापती व उपसभापती निवड झाली. मात्र या दोन्ही वेळेस ते बैठकीला उपस्थित नव्हते. पाटील हे हिवरखेडे बुद्रुक येथील रहिवासी असून ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार निश्चितीवरून त्यांचे नेत्यांशी मतभेद झाले होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -