fbpx

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी संघटन कार्याला गती द्यावी ; खा.रक्षा खडसे

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२१ । भारतीय जनता पार्टी सावदा शहराची विस्तृत बैठक आज संकल्प सिद्ध श्री गणेश मंदिर सावदा येथे भाजपच्या संघटनात्मक पुनर्रचनेच्या नियोजनाच्या बैठकीसाठी खासदार रक्षा खडसे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व रावेर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांचे उपस्थितीत संपन्न झाली.

बैठकीच्या सुरुवातीला  आपल्या देशाच्या संरक्षणार्थ शहीद झालेले जवान व दिवंगत कोरोना योद्धे व कोरोना महामारीत बळी पडलेले नागरिक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शहर अध्यक्ष पराग पाटील यांनी प्रास्ताविकात आजची विस्तृत बैठक संघटनात्मक पुर्नरचनेची असुन आगामी काळात पक्ष संघटनेचे अध्यक्ष म्हणुन कार्य करण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची नावे उपस्थितांमधून घेण्यात आली.

त्यामध्ये अक्षय सुभाष सरोदे, हरीश यशवंत इंगळे,लतेश रवींद्र चौधरी, जितेंद्र किसन भारंबे, गजानन बाबुराव भार्गव, सागर दुर्गादास चौधरी, सचिन चुडामण बऱ्हाटे, अशी इच्छुक कार्यकर्त्यांचा समावेश असून संघटनात्मक वर्तणूक व पक्षनिष्ठा  याविषयावर नंदूभाऊ महाजन यांनी कार्यकर्त्यांना वैयक्तिक हितसंबंध बाजूला ठेवून पक्ष वाढीचा संदेश दिला तर डॉ.अतुलदादा सरोदे यांची covid-19 च्या व भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय समिती मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

डॉ. सरोदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना समर्पित वृत्तीने व निष्ठेने पक्षाचे कार्य करणाऱ्या तळागाळातील कार्यकर्त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये भवितव्य असून एकेकाळी चहा विकणारे आज देशाचे पंतप्रधान पदी आहेत साधे नगरसेवक असणारे फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होतात हे फक्त भारतीय जनता पार्टी मध्ये घडते कारण हा पक्ष कोणत्याही घराण्याच्या मालकीचा नसून जाती पंथ संप्रदायाच्या पलीकडे सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे.

त्यामुळे अविचल पणे पक्षाचे कार्य करत राहण्याचा सल्ला त्यांनी उपस्थित  कार्यकर्त्यांना दिला.तालुकाध्यक्ष राजनभाऊ लासूरकर यांनी इच्छुक कार्यकर्त्यांची नावे जिल्हा समिती कडे ठेवण्यात येऊन त्यातून एका कार्यकर्त्याची निवड करण्यात येईल असे सांगितले व आगामी संघटनात्मक कार्यक्रमांविषयी माहिती दिली. बैठकीच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना रक्षा खडसे यांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी संघटन कार्याला गती द्यावी व भारतीय जनता पार्टीची मजबूत फळी उभी करून व्यापक जनहिताचे कार्य करावे असे सांगितले.

याबैठकीस रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार रक्षा खडसे, उत्तर महाराष्ट्र किसान मोर्चाचे अध्यक्ष  सुरेशभाऊ धनके, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, डॉ.अतुल सरोदे, सावदा शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ.अनिता येवले, शिवाजीराव पाटील भाजपा मुक्ताईनगर विधानसभा सहक्षेत्र प्रमुख, सी. एस. पाटील  भाजपा रावेर तालुका सरचिटणीस महेशभाऊ चौधरी, सौ रेखाताई बोंडे अध्यक्षा भाजप महिला आघाडी, सौ सारिका चव्हाण सरचिटणीस भाजपा महिला आघाडी रावेर तालुका माजी अध्यक्षा सौ.नेहाताई गाजरे, विदयमान नगरसेविका सौ.रंजना भारंबे, नगरसेविका सौ.करुणा पाटील, नगरसेविका सौ.लीना चौधरी, गटनेते नगरसेवक अजयभाऊ भारंबे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, अतुलभाऊ ओवे, अतुल नेहेते, जितेंद्र गाजरे,हरीष इंगळे, महेश अकोले, संतोष परदेशी, गजानन भार्गव, अक्षय सरोदे,लतेश चौधरी,विजय पाटील, सागर चौधरी, भारत चव्हाण, प्रतीक भारंबे, लतेश सरोदे, सचिन बऱ्हाटे, राकेशकुमार पाटील, भाजपा सरचिटणीस कमलेश भारंबे, राजकिरण बेंडाळे हे कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन शहराध्यक्ष पराग पाटील यांनी तर आभार महेश अकोले यांनी मानले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज