fbpx

उद्योजक व जीएम फाउंडेशतर्फे पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात ; साहित्याचे ५ ट्रक रवाना

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२१ । गेल्या काही दिवसापूर्वी कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे प्रचंड प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली. यामध्ये विशेष करून चिपळूण, महाळ संपूर्ण गाव पाण्याखाली गेले. मागील आठवड्यात माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते आ.प्रवीण दरेकर व माजी मंत्री आ.गिरीश महाजन हे कोकणातील पूरग्रस्त लोकांच्या सेवेसाठी तळ ठोकून आहेत. 

गिरीश महाजन यांच्या माध्यमातून गेल्या दोन दिवसांपूर्वीच २ ट्रक पाठविण्यात आल्या.  पुन्हा दि.२८ जुलै रोजी दुपारी १२ वाजता भाजपा व GM फाउंडेशन व एम.आय.डी.सी.उद्योजक बांधवांतर्फे व भाजपा २ ट्रक जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे (राजूमामा), महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उद्योजक राजूभाऊ अडवाणी, संतोष इंगळे उद्योजक  यांच्या हस्ते आज  ट्रक रवाना करण्यात आले. 

या प्रसंगी मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, गटनेते भगत भाई बालानी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी, महेश जोशी, विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे, प्रा.भगत सिंग निकम, मनोज भांडारकर, अक्षय चौधरी, GM फाउंडेशन संपर्क प्रमुख अरविंद देशमुख, मंडळ अध्यक्ष अजित राणे, शक्ती महाजन, विनोद मराठे, युवा मोर्चाचे जयेश ठाकूर ई.उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt