fbpx

‘ओबीसी की शान मे भाजपा मैदान में’ : भुसावळात ‘भाजपाचे चक्काजाम’

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२१ । महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याने ओबीसी समाजावर अन्याय झाल्याची भावना भाजपा पदाधिकार्‍यांनी व्यक्त करीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील ग्रामीण रुग्णालयाजवळील भाजपा शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे यांच्या पेट्रोल पंपासमोर शनिवारी दुपारी 12 वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

आंदोलनामुळे महामार्ग काही वेळेसाठी ठप्प झाला. पोलिसांनी प्रसंगी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. याप्रसंगी आमदार संजय सावकारे यांच्यासह आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत रस्त्याच्या बाजूला केले. सुमारे अर्धा तास आंदोलनकर्त्यांनी प्रसंगी घोषणाबाजी केली.

आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

ओबीसी आरक्षण मिळाले पाहिजे, आमदार आगे बढो, भाजपाचा विजय असो, ओबीसी की शान मे भाजपा मैदान में, आघाडी सरकार करतय काय खाली डोकं वर पाय, महाविकास आघाडीचा धिक्कार असो आदी घोषणांनी परीसर प्रसंगी दणाणला होता.

सर्वच आरक्षणात खोडा ; आमदार संजय सावकारे

मराठा समाज आरक्षण असो की ओबीसी आरक्षण असो महाविकास आघाडी सरकारने खोडा घातला असल्याचा आरोप यावेळी आमदार संजय सावकारे यांनी केला. ते म्हणाले की, मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणही या आघाडी सरकारने थांबवले असून सर्वच समाजावर अन्याय या सरकारने केला आहे.  सर्व समाजाला न्याय मिळावा या मागणीसाठी आजचे आंदोलन असल्याचे ते म्हणाले. आंदोलनात भाजपा शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, नगरसेवक युवराज लोणारी, राजेंद्र आवटे, राजू खरारे, पवन बुंदेले आदींसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज