बालगृहात वाढदिवस रंगीत ड्रेस भेट देऊन साजरा

बातमी शेअर करा

 

जळगाव लाईव्ह न्युज | ६ सप्टेंबर २०२१ | तालुक्यातील खडके बु.येथिल अनाथ,निराधार मुलां मुलींच्या बालगृहात शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलीत अप्पासाहेब र भा गरूड महाविद्यालयाचे उपप्राचार्य उच्च विद्याविभुषित प्रा.डॉ.श्री.शाम जिवन साळुंखे आणि प्रिती साळुंखे यांची मुलगी आयुषी हिचा १२ वा वाढदिवस साजरा केला.या निमित्ताने परिवारातील सदस्यांनी मुलांशी संवाद साधलाा. परिस्थितीशी संघर्ष करून जगत असलेल्या बालकांंचेे हास्य पाहुन ते भारावून गेले. वाढदिवसानिमीत्त  या संस्थेस भेट दिल्यामुळे फारच आत्मिक समाधान वाटले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. याप्रसंगी वाढदिवसा निमित्त बालकांना आवश्यक असलेले रंगीत ड्रेस भेट देण्यात आले आणि मिष्टान्न स्नेह भोजन दिले.

याप्रसंगी अप्पासाहेब र.भा. गरूड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव रमेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना बालकांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि मुलांसाठी अत्यंत आवश्यक असणारे सोलर वाटर हिटर एका महिन्याच्या आत बसविण्याचे आश्वासन दिले आणि कॉलेज मधील सर्व प्राध्यापक सहकारी यापुढे शक्य ती मदत करतील असे आश्वासन दिले.मुलांवर विषेश प्रेम असलेले सध्या नागपुर एस.बी.आय शाखा प्रबंधक . आषिश मेंढे साहेब हे सपत्निक उपस्थित होते. त्यांनी मनोगत व्यक्त करताना नातेवाईकांसोबत कार्यक्रम साजरा करण्यापेक्षा अनाथ बालकांसोबत कार्यक्रम साजरा केल्यावर आत्मिक समाधान लाभल्याचे सांगितले. कार्यक्रमासाठी शेंदुर्णी कॉलेजचे प्रा.डॉ.प्रशांत देशमुख;प्रा.डॉ.दिनेश पाटील;प्रा.डॉ.रोहिदास गवारे; प्रा.डॉ.महेश पाटील ;प्रा.डॉ.सुजाता पाटील ; डॉ वसंत पतंगे प्रा.अमर जावळे; डॉ अजिनाथ जीवरग, प्रा राहूल गरुड, डॉ संदीप कोतकर, प्रा विजय वाघ श्री युवराज अहिरे,एन.डी.सपकाळे,प्रविण सुरवाळे इ.मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संस्थाचालक प्रभाकर पाटील यांनी साळुंखे यांनी वाढदिवस संस्थेत साजरा केल्यामुळे आणि कार्यक्रमासाठी तोलामोलाचे मान्यवर उपस्थित असल्यामुळे मनस्वी आभार मानले.कार्यक्रमासाठी अधिक्षक मधुकर कपाटे ,प्रमोद पाटील ,गणेश पंडीत,तुषार अहिरे, अरूणा पंडीत,यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -