fbpx

मोनाली कामळस्कर फाऊंडेशनतर्फे पक्षी बचाव अभियान

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२१ ।  गेल्या 13 वर्षापासून उन्हाळ्यात पक्षांना पाणी पिण्यासाठी परळ (मातीचे पसरट भांडे) वाटण्याचा कार्यक्रम होत असतो. जागतीक चिमणी दिवसाचे व आमचे संस्थापक संचालक स्व. बाळकृष्ण नथ्थू वाणी याच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला.

सदरील कार्यक्रमांस माळी समाजाचे प्रमुख व फळ,भाजीपाला आडते संजय महाजन तसेच बँक ऑफ बडोदा चे मॅनेजर के. के. राऊत  हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर काथार वाणी समाजाचे माजी अध्यक्ष विजय नारायण वाणी यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी जवळ-जवळ 200 परळ व धान्यांचे छोटे पॅकेट मोफत वितरित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष सुधाकर वाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थापक नंदकिशोर कामळस्कर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनंत वाणी, वासुदेव वाणी, शंकर वाणी, राजेश वाणी, अजय कामळस्कर, रवींद्र वाणी,  राहुल हरणे,  शरद वाणी,  ललित वाणी, निखिल वाणी रोहित वाणी शामकांत वाणी दिलीप वाणी यांनी मेहनत घेतली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt