बिलखेडा येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२१ । जळगाव तालुक्यातील बिलखेडा येथील ६२ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घटना आज दुपारी उघडकीस आली. माधवराव श्रावण कुंभार (62) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे

बिलखेडा येथील माधवराव कुंभार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस पाटील मुकुंदा पाटील यांनी दिलेल्या खबरीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. सहायक फौजदार राजेंद्र उगले, पो.कॉ. अनिल पाटील, हेमंत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. उत्तरीय तपासणीकामी मृतदेह शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला. माधवराव कुंभार यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज