जळगावात एकाची दुचाकी लांबविली, गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२१ । जळगाव शहरात दुचाकी चोरीच्या घटना काही केल्या थांबत नाहीय. दिवसेंदिवस या घटना घडत असून यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच  शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून नितिन ओंकार पांडे (वय-५०) रा. पिंप्राळा यांची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, नितिन पांडे हे कामाच्या निमित्ताने ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजता जळगाव रेल्वे स्थानक परिसरातील पार्किंग समोर दुचाकी (एमएच १९ बीएच ३६७१) ने आले. दुचाकी पार्किंग करून कामानिमित्त बाहेर गेले. अज्ञात चोरट्यांनी त्यांची पार्किंगला लावलेली ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी नितीन पांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज