fbpx

जळगावातून तरुणाची दुचाकी लांबविली

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९  मे २०२१ । जळगाव शहरात दुचाकी चोरीच्या घटना सुरूच आहे. शहरातील त्रिमुर्ती हॉटेलजवळील पिपल्स बँकेसमोरून एका तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीला आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, विनोद रविंद्र बेडीसकर (वय-२६) रा. रामेश्वर कॉलनी जळगाव हे खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतात. ६ मे रोजी सकाळी १० वाजता ते कामाच्या निमित्ताने जळगाव औरंगाबाद रोडवील हॉटेल त्रिमुर्ती जवळील जळगाव पीपल्स बँकेसमोर लावलेली दुचाकी ( क्रमांक एमएच १९ सीसी ५५७३)  पार्कींगला लावली. रात्री १० वाजता ते दुचाकीजवळ आले असता त्यांना त्यांची दुचाकी मिळून आली नाही.

mi advt

परिसरात शोधाशोध करून दुचाकी न मिळल्याने त्यांनी एमआयडीसी पोलीसात धाव घेतली. विनोद बेडीसकर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज