fbpx

एरंडोल येथे बंद घरातून दागीने व रोकड लंपास

mi-advt

 

जळगाव लाईव्ह न्यूज | १३ सप्टेंबर २०२१ |  घर मालकीण बाहेर गावी गेल्या असता अज्ञात चोरट्याने बंद दरवाजाचे कुलुप तोडून घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागीने व रोकड असा एकूण ९३ हजार १०० रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. 

दरवाजा बंद करून बाहेरगावी गेलेले घर हे चोरी करण्यासाठी चोरट्यांना जणू पर्वणीच ठरते की काय..? अशी प्रचिती नवीन वसाहतीतील रहीवाश्यांना येत आहे.म्हणून घराला कुलुप लावून बाहेरगावी जाणे म्हणजे चोरांना आमंञण देण्यासारखे आहे अशी नागरीकांमध्ये चर्चा होत आह. 

उषाबाई रामकृष्ण महाले या एरंडोल येथे शहराच्या शेवटी असलेल्या साईनगरात राहत असून दि.७सप्टे.२०२१ रोजी त्या घराच्या खिडक्या-दरवाजे बंद करून, दरवाजास कुलुप लावुन एरंडोल येथून ट्रँव्हल्स गाडीने ठाणे येथे भावाकडे जाण्यास निघाल्या.११सप्टें रोजी त्यांच्या घरात चोरी झाल्याचे फोनद्वारे भाडेकरू ने त्यांना कळविले.

त्या एरंडोल येथे परत आल्यावर त्यांच्या घरात सोन्या-चांदीच्या अंगठ्यांसह इतर दागीने व रोख रक्कम १६हजार रूपये असा एकूण ९३हजार १०० रूपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला.या घटनेबाबत उषाबाई महाले यांनी रवीवारी एरंडोल पोलिस स्टेशन ला तक्रार दिल्यावरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुढील तपास सहायक फौजदार विकास देशमुख व पोलिस हवालदार अनिल पाटील हे करीत आहेत.

नागरीक भयभीत

दरवाजा बंद करून बाहेरगावी गेलेले घर हे चोरी करण्यासाठी चोरट्यांना जणू पर्वणीच ठरते की काय..? अशी प्रचिती नवीन वसाहतीतील रहीवाश्यांना येत आहे.म्हणून घराला कुलुप लावून बाहेरगावी जाणे म्हणजे चोरांना आमंञण देण्यासारखे आहे अशी नागरीकांमध्ये चर्चा होत आहे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज