बिग ब्रेकिंग : मोदींनी केली घोषणा, लहान मुलांचे लसीकरण तर मोठ्यांना बूस्टर डोस

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२१ । भारतातही ओमायक्रॉनचा (Omaicron) धोका वाढला आहे. याबाबत थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केल आहे. पंतप्रधानांनी मोठी घोषणा केली आहे असून येत्या ३ जानेवारी पासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोनाचे लसीकरण सुरु होणार आहे. तसेच इतरांना देखील बूस्टर डोस दिला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशात नव्या संकटाचा सामना करण्यासाठी 1 लाख 40 आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. देशात 61 टक्के नागरिकांचे दोन डोस पूर्ण झाले आहे. तर 60 वर्षांपुढील 90 टक्के नागरिकांनी एक लस घेतली आहे. नियमांचे पालन केल्यास कोरोनावर मात करणे सहज शक्य होणार आहे. जेव्हा अनेक जिल्ह्यातील 100 टक्के लसीकरण (vaccinated) पूर्ण झाल्याच्या बातम्या येतात तेव्हा अभिमान वाटतो.

मोदी म्हणाले, लसीकरणाबाबत सध्या देश सध्या ऍक्शन मोडमध्ये आहे. देशात 141 कोटी नागरिकांना लस देण्यात आलेली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी या काळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ओमायक्रॉनची सध्या चर्चा होत असून देशातील शास्त्रज्ञांचे त्यावर लक्ष असल्याचे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले.

मोदींनी सांगितले, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहत नियमांचे पालन करण्याचे गरज आहे. नियमित मास्क वापरणे गरजेचे आहे. व्हायरस म्युटेट होत असल्याने आव्हाने देखील वाढले आहे. लसीकरण हे कोरोन विरोधी लढाईतलं मोठं शस्त्र आहे. शास्त्रज्ञ अभ्यास करीत असून लवकरच उपायदेखील मिळेल, असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

– साठ वर्षांवरील सहव्याधीग्रस्त व्यक्तींना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिसरा डोस देणार. त्याची सुरुवातही १० जानेवारीपासून.

– आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देणार. १० जानेवारीपासून तिसरा डोस.

– पंधरा ते अठरा वर्षांच्या मुलांसाठी लसीकरण ३ जानेवारीपासून सुरू करणार.

– ओमिक्रॉनला घाबरण्याचे कारण नाही. केवळ सतर्क राहा आणि कोविड नियम पाळा : पंतप्रधान मोदी

– तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेता DCGI ने 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

कोव्हॅक्सीनला देशात परवानगी

एका अहवालानुसार SEC ने ऑक्टोबरमध्ये DCGI कडे लहान मुलांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोव्हॅक्सीन देण्यासंदर्भातील प्रस्ताव दिला होता. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी ही दिलासादायक बातमी आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनला ही परवानगी मिळाली आहे.

भारतातही ओमायक्रॉनचा (Omaicron) धोका वाढला आहे. याबाबत थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केल आहे. पंतप्रधानांनी मोठी घोषणा केली आहे असून येत्या ३ जानेवारी पासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोनाचे लसीकरण सुरु होणार आहे. तसेच इतरांना देखील बूस्टर डोस दिला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशात नव्या संकटाचा सामना करण्यासाठी 1 लाख 40 आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. देशात 61 टक्के नागरिकांचे दोन डोस पूर्ण झाले आहे. तर 60 वर्षांपुढील 90 टक्के नागरिकांनी एक लस घेतली आहे. नियमांचे पालन केल्यास कोरोनावर मात करणे सहज शक्य होणार आहे. जेव्हा अनेक जिल्ह्यातील 100 टक्के लसीकरण (vaccinated) पूर्ण झाल्याच्या बातम्या येतात तेव्हा अभिमान वाटतो.

मोदी म्हणाले, लसीकरणाबाबत सध्या देश सध्या ऍक्शन मोडमध्ये आहे. देशात 141 कोटी नागरिकांना लस देण्यात आलेली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी या काळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ओमायक्रॉनची सध्या चर्चा होत असून देशातील शास्त्रज्ञांचे त्यावर लक्ष असल्याचे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले.

मोदींनी सांगितले, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहत नियमांचे पालन करण्याचे गरज आहे. नियमित मास्क वापरणे गरजेचे आहे. व्हायरस म्युटेट होत असल्याने आव्हाने देखील वाढले आहे. लसीकरण हे कोरोन विरोधी लढाईतलं मोठं शस्त्र आहे. शास्त्रज्ञ अभ्यास करीत असून लवकरच उपायदेखील मिळेल, असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

– साठ वर्षांवरील सहव्याधीग्रस्त व्यक्तींना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिसरा डोस देणार. त्याची सुरुवातही १० जानेवारीपासून.

– आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देणार. १० जानेवारीपासून तिसरा डोस.

– पंधरा ते अठरा वर्षांच्या मुलांसाठी लसीकरण ३ जानेवारीपासून सुरू करणार.

– ओमिक्रॉनला घाबरण्याचे कारण नाही. केवळ सतर्क राहा आणि कोविड नियम पाळा : पंतप्रधान मोदी

– तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेता DCGI ने 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

कोव्हॅक्सीनला देशात परवानगी

एका अहवालानुसार SEC ने ऑक्टोबरमध्ये DCGI कडे लहान मुलांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोव्हॅक्सीन देण्यासंदर्भातील प्रस्ताव दिला होता. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी ही दिलासादायक बातमी आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनला ही परवानगी मिळाली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -