fbpx

भुसावळात महिलेच्या गळ्यातून चैन लांबवली

भुसावळातील पीओएच रेल्वे कॉलनीतील प्रकार : शहर पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२१ । पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात शिरलेल्या दोघा भामट्यांनी महिलेचे तोंड दाबत त्यांच्या गळ्यातील 35 हजार रुपये किंमतीची चैन लांबवली. ही घटना शनिवारी दुपारी कंडारी येथील पीओएच कॉलनीत घडली. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या रेल्वे कर्मचार्‍यांच्या निवासस्थान परीसरातील सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पाण्याच्या बहाण्याने लांबवले चैन

कंडारी येथील पीओएच कॉलनीतील क्वॉर्टर क्रमांक 1202 येथे रेल्वेतील कर्मचारी एच.के. ठाकूर हे राहतात. शनिवारी दुपारी ठाकूर 3.40 वाजता कामावर गेल्यावर त्यांची पत्नी पूजा ठाकूर या घरी असताना दोन युवकांनी पाण्याची मागणी केली. पाणी घेण्यासाठी विवाहिता घरात गेल्यानंतर दोघे युवक त्यांच्या मागे आले व त्यांनी विवाहितेचे तोंड दाबून त्यांच्या गळ्यातील 35 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन तोडून लांबविली. यावेळी पूजा ठाकूर यांनी आरडाओरड केल्याने दोन्ही भामट्यांनी पळ काढला. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

चोरटे जाळ्यात अडकण्याची शक्यता

शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेस रेकॉर्डवरील संशयीतांचे फोटो दाखवण्यात आले असून त्यातील काहींचे फोटो महिलेने ओळखले असून त्यातून संशयीत जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप दुणगहू पुढील तपास करीत आहे. घटना स्थळी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी भेट देऊन माहिती घेतली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज