भुसावळचे ज्येष्ठ छायाचित्रकार एम. आर. पवार यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ नोव्हेंबर २०२१ । भुसावळ शहरातील रहिवासी तथा प्रसिद्ध छायाचित्रकार एम. आर. पवार ( वय ८९) यांचे रविवारी (दि. ३१) पिंपरी चिंचवड येथील रहाटणी येथे अल्पशा आजाराने निधन झाले. पवारांचे बहुतांश वास्तव्य हे भुसावळात होते. पवार यांचे मूळ गाव निंभोरा (ता. रावेर) होते.

भुसावळात रेल्वेतील नोकरी सोबतच १९७३ पासून त्यांनी फोटोग्राफी या कलेचा छंद जोपासला. यात त्यांनी जागतिक पातळीवर आपल्या कलेचा ठसा उमटवला. इंडिया इंटरनॅशनल फोटोग्राफीक सोसायटी, नवी दिल्लीचे ते व्हाईस प्रेसिडेंट होते. फोटोग्राफीत त्यांना अनेक पुरस्कार व सन्मान प्राप्त आहेत. भारतातील आयआयपीसी या जागतिक दर्जाच्या फोटोग्राफी संस्थेची ‘युरेनियम’ स्टार ही डिग्री त्यांनी प्राप्त केली होती. खान्देशातील थंड हवेचे ठिकाण पाल येथील आदिवासी मुलगी व बकरीचे पिलू, दाराच्या चौकटीतून घरात डोकावणारा कुत्रा, भुसावळात तापी नदीवरील गाढव असे त्यांचे अनेक फोटो गाजले. विविध प्रसिद्धी माध्यमांनी त्यांची दखल घेतली. अनेक माध्यमांमध्ये त्यांचे फोटो प्रकाशित झाले होते. पुण्यातील प्रसिद्ध छायाचित्रकार व पत्रकार राजेश पवार यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

प्रकाशित झाले होते. पुण्यातील प्रसिद्ध छायाचित्रकार व पत्रकार राजेश पवार यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज