खुशखबर..’या’ तारखेपासून भुसावळ-इगतपुरी मेमू ट्रेनला सुरवात, जाणून घ्या वेळापत्रक

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२१ । कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर गेल्या मार्च २०२० पासून भुसावळ-देवळाली शटल बंद करण्यात आली. यामुळे चाकरमान्यांसह सर्वसामान्यांना प्रवाशांची गैरसोय होत होती. दरम्यान, आता पॅसेंजर ऐजवजी मेमू एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय भुसावळ(Bhusawal) रेल्वे प्रशासनाने घेतला असून देवळाली ऐवजी आता भुसावळ-इगतपुरी (Igatpuri) मेमू (Memu) ट्रेनला १० जानेवारीपासून सुरवात होणार आहेत. या गाडीला मेल, एक्स्प्रेस या गाडीचे तिकीट दर आकारले जाणार आहे. भुसावळ-देवळाली शटल सर्व थांब्यावर थांबत होती. त्यातील सात स्थानकांवर मेमू गाडी थांबणार नाही.

सध्या देशभरात कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. कोरोनाची पहिली, दुसरी लाट आटोपल्यावरही गाडी सुरू होत नसल्याने सातत्याने गाडी सुरू करण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने गुरुवारी नोटिफिकेशन काढले आहे.

भुसावळ-देवळाली ऐवजी आता भुसावळ-इगतपुरी मेमू गाडी चालणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून ही गाडी १० जानेवारीपासून सुरू केली जाणार आहे. भुसावळ- इगतपुरी मेमू गाडी ही भुसावळ जंक्शनवरून सकाळी सातला सुटेल. ७.२६ ला जळगाव ला पोहोचेल. १०. ०९ ला चाळीसगाव येथे पोहोचेल. १२.०८ ला मनमाड पोहोचेल व १३. २३ ला नाशिक नंतर इगतपुरीला दुपारी तीनला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ही गाडी इगतपुरी येथून सकाळी ९. ५ वाजता सुटेल. तर जळगाव येथे ती सायंकाळी १६.२७ ला पोहोचेल तर भुसावळ जंक्शनवर ही गाडी सायंकाळी ५. १० वाजता पोहोचेल.

ही गाडी आठ डब्यांची असणार आहे. मेल, एक्स्प्रेस गाडीचे दर आकारले जाणार आहे. मेमू ट्रेनची ट्रायल काल गुरुवारी (दि 6) घेण्यात आली. भुसावळहून या गाडीचा आलेला रेक रात्री साडेआठ वाजता मनमाड रेल्वे स्थानकामधून इगतपुरीकडे रवाना झाला. तर शुक्रवारी या गाडीचा रिकामा रेक इगतपुरीहून भुसावळ येथे रवाना रवाना होणार आहे.

पॅसेंजरचे हे थांबे रद्द
भुसावळ-देवळाली शटल सर्व थांब्यावर थांबत होती. त्यातील सात स्थानकांवर मेमू गाडी थांबणार नाही. यात वाघळी, पिंपरखेड, हिस्वल, समीट, पीजन, ओढा, लहाविट या स्थानकांवर ही गाडी थांबणार नाही.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -