fbpx

भुसावळातील २८ उपद्रवींना शहर बंदीचे आदेश

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२१ । नवरात्राेत्सवात २८ जणांच्या शहर बंदीचे आदेश प्रांतांनी काढले. पोलिस प्रशासनाने एकूण ६८ जणांना ७ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत शहर बंदीचे प्रस्ताव प्रांतांकडे दिले होते. पैकी २८ प्रस्तावांवर शिक्कामोर्तब झाले.

भुसावळ शहर, बाजारपेठ व तालुका पोलिसांमार्फत प्राप्त प्रस्तावांची चाैकशी करून भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी गुरुवारी पहिल्या टप्प्यात २८ जणांच्या शहर बंदीचे आदेश काढले.

mi advt

शहरबंदी केलेल्यांची नावे:

शहरबंदी केलेल्यांमध्ये शिवाजी सोपान साळुंखे, शम्मी प्रल्हाद चावरीया, शिव परशुराम पथरोड, विष्णू परशुराम पथरोड, चेतन पुंजाजी कांडेलकर, विलास काशीनाथ जाधव, निखील सुरेश राजपूत, मंगेश अंबादास काळे, पिरू मंगा गवळी, अमीत अशोक सोनवणे, जितू शरद भालेराव, कुंदन रामदास वानखेडे, शेख रशिद शेख मासूम, गिरीश गोकुळ जोहरी, अब्दुल एजाम अब्दुल सलाम, गौरव राजेंद्र वाघ, मोहंमद ईस्माईल मोहंमद आलम, हर्षल उर्फ छन्नू दत्तात्रय राणे, दीपक उर्फ टापऱ्या सुभाष सोनवणे, राहुल नामदेव कोळी, सचिन अरविंद भालेराव, नवाब मोहंमद गवळी, नरेंद्र मोरे, शामल शशिकांत कोळी, अक्षय रतन सोनवणे, लक्ष्मण दलपत मोरे यांचा समावेश आहे, असे डीवायएसपी साेमनाथ वाघचाैरे यांनी सांगितले. हे आदेश बजावणे सुरू आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज