भुसावळच्या बालकाचा डेंग्यूने मृत्यू

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२१ । भुसावळ शहरातील गंगाराम प्लॉट भागातील मूळ रहिवासी व हल्ली औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेल्या यज्ञेश वसंत पाटील (वय १३) याचेवर डेंग्यूचे उपचार सुरू होते. गुरुवारी त्याचा औरंगाबाद येथे मृत्यू झाला.

यज्ञेश पाटील हा औरंगाबाद येथील हुडको भागात रहिवासाला होता. आजारी पडल्यानंतर त्याच्यावर औरंगाबाद येथील निमाय रुग्णालय व नंतर महात्मा गांधी रुग्णालयात उपचार झाले. यावेळी त्यास डेंग्यूचे निदान झाले. उपचार सुरू असताना गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. यानंतर भुसावळ येथे मृतदेह आणून दुपारी अंत्यविधी करण्यात आले. यज्ञेश हा भुसावळातील दामोदर बाबूराव पाटील यांचा नातू, तर किरण पाटील व महेश पाटील यांचा पुतण्या हाेता.

दरम्यान, यज्ञेश हा औरंगाबादचा रहिवासी असून या कुटुंबातील वडील वसंत पाटील, आई पूनम पाटील व बहीण सई पाटील यांना कुठलाही त्रास नसल्याचे भुसावळ पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.कीर्ती फलटणकर यांनी सांगितले. तसेच शहरात आरोग्य विभागामार्फत डेंग्यूचे सर्वेक्षण सुरू आहे, अशीही माहिती दिली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -