fbpx

एरंडोल न.पा.तर्फे विविध विकास कामांचे भूमिपूजन

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जुलै २०२१ । एरंडोल नगर पालिका हद्दीतील गट क्र ८३५ कासोदा रस्ता अंजनी नदी शेजारी मन्यार कब्रस्थान येथे संरक्षक भिंत तसेच कासोदा नाक्याजवळील स्व. दादाश्री मुकुंदसिंग परदेशी प्रवेशव्दार या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.

तसेच शासनाच्या वृक्ष लागवड २०२१ या मोहीमेचा शुभारंभ उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहूणे महाराष्ट्र जनजातीय संपर्क प्रमुख भाजपाचे किशोर काळकर, लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी, नगरसेवक मनोज पाटील, डॉ.नरेंद्र ठाकुर, डॉ.सुरेश पाटील, योगेश महाजन, असलम पिंजारी, जहीरोद्दिन शेख कासम, वर्षाताई शिंदे, कृणालभाऊ महाजन, नितीन चौधरी, सौ.छायाताई दाभाडे, सौ.दर्शनाताई ठाकुर, सौ.जयश्री पाटील, सुरेखाताई चौधरी, सौ.प्रतिभा पाटील, भाजप शहर अध्यक्ष निलेश परदेशी, अॅड.अहमद सय्यद व शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरीक व कुंदनसिंग ठाकूर उपस्थित होते.

mi advt

तसेच न.पा मुख्याधिकारी किरण देशमुख व नगर पालिका कर्मचारी उपस्थीत होते. उपस्थितांना किशोर काळकर, असलम पिंजारी यांनी मार्गदर्शन केले. न.पा अध्यक्ष यांनी सर्वांचे आभार मानले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज