धानोरा फाटा ते धानोरा रस्त्याचे आ.अनिल पाटलांच्या हस्ते भूमीपूजन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ । शेतकरी व ग्रामीण जनतेस शहराशी जोडून पूरक व्यवसायास चालना देण्याचा आणि त्यांना प्रगतीपथावर नेण्याचा आपला प्रयत्न असून यासाठी ग्रामिण रस्ते चकचकीत करण्याचा ध्यास आपण घेतला असल्याची भावना आ.अनिल पाटील यांनी धानोरा येथे रस्ता भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केली.

धानोरा येथे आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत १५ लक्ष निधीतून धानोरा फाटा ते धानोरा रस्ता डांबरीकरण करणे या कामाचे भूमिपूजन आणि धानोरा गावात १० लक्ष निधीतून झालेल्या काँक्रेटिकरण कामाचे लोकार्पण आमदार अनिल भाईदास पाटील व जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी तरवाडे सरपंच रामकृष्ण पाटील, धानोरा सरपंच दिलीप ठाकरे, उपसरपंच अमोल दिलीपसिंग पाटील, शिंदे, शालिक ठाकरे, राजाराम ठाकरे, गुलाबराव शिंदे, शरद शिंदे, चेतन शिंदे, शांताराम ठाकरे, नितीन पाटील छबीलाल ठाकरे, रामदास भिल, सुनील पवार, प्रदिप ठाकरे, छबिलाल भिल, हिम्मतराव ठाकरे यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, धानोरा फाटा ते धानोरा रस्त्याची दुरावस्था झाली असताना आ.अनिल पाटील यांनी ही प्रमुख समस्या सोडविल्याने सर्व उपस्थित ग्रामस्थांनी आमदारांचे विशेष आभार व्यक्त केले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -