fbpx

महापौरांच्या हस्ते जळगावात विकासकामांचे भूमिपूजन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२१ । जळगाव शहरातील समता नगर परिसरात पाथ वे काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचा महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते सोमवारी शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, महापौरांनी प्रभाग १७ मध्ये मुख्य डांबरी रस्ते दुरुस्त करण्याच्या कामाची देखील पाहणी केली.

समता नगर परिसरातील पाथवे काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचा सोमवारी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी नारळ वाढवून शुभारंभ केला. यावेळी नगरसेविका ज्योती चव्हाण, सुरेखा तायडे, नगरसेवक नितीन बरडे, मनपा शहर अभियंता अरविंद भोसले आदी उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक १७ मध्ये मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाचा काही महिन्यांपूर्वी शुभारंभ करण्यात आला होता. परंतु अद्यापपावेतो काम सुरू न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. परिसरातील नागरिकांनी महापौर जयश्री महाजन यांच्याकडे याबाबत तक्रारी केल्या असता महापौरांनी तक्रारीची दखल घेत अधिकाऱ्यांना बोलवून सोमवारी कामाची प्रत्यक्षात पाहणी केली. महापौरांनी मनपा अधिकारी व मक्तेदार यांना सूचना केल्या असून दोन दिवसात रस्ते डांबर मिश्रित खडीने बुजविणे आणि दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज