fbpx

पारोळ्यात विकास कामांचा भूमिपूजन सोहळा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ । पारोळा नगरपरिषदेसाठी वैशिष्टपूर्ण योजनेंतर्गत मंजूर ४ कोटी रुपयांचा विकास कामांचा आमदार चिमणराव पाटील यांच्या शुभहस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. याप्रसंगी पारोळा अमोल पाटील,  नगराध्यक्ष दयारामआण्णा पाटील, चतुर पाटील, प्रा.आर.बी.पाटील  इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

खलील कामाचे भूमिपूजन पार पडले

१) पारोळा शहरातील बडा मोहल्ला भागातील श्री.मिश्किन शहा दर्गा ते श्री.अशोक मराठे यांच्या पण टपरी पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे. – १२.०० लक्ष

२) पारोळा शहरातील श्री.सलीम बादशाह यांचे घरापासून ते श्री.जानकीराम शिंपी यांचे घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे.(प्रभाग – ३) – १२.०० लक्ष

३) पारोळा शहरातील प्रभाग क्र- ८ मधील मडके मारोती चौक पासून ते गोंधळवाड्यातील मशिदीपर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करणे. – १२.०० लक्ष

४) पारोळा शहरातील प्रभाग क्र.८ मधील जुलूमपुरा भागातील श्री.साईबाबा मंदिर जवळील गोलाकार रस्त्याचे गटारीसह सिमेंट काँक्रीटीकरण करणे. – १२.०० लक्ष

५) पारोळा शहरातील प्रभाग क्र. ८ मधील जुलूमपुरा भागातील पुरुष व स्त्रियांच्या सार्वजनिक शौचालयापासून ते बस स्टँण्ड कडे जाणारी गटार भूमीतगत पद्धतीने बांधकाम करणे. – १०.०० लक्ष

६) पारोळा शहरातील मडक्या मारोती चौक ते मोठा महादेव चौक पर्यंत रस्ता खोदकाम करून काँक्रीटीकरण करणे. (प्रभाग – ८) – १५.०० लक्ष

७) पारोळा शहरातील मडक्या मारोती चौक ते पीर दरवाजा पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे. – १५.०० लक्ष

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज