‘खंडोबा’ देवस्थानाच्या सभामंडपाच्या कामाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

जळगाव लाईव्ह न्यूज | २४ ऑक्टोबर २०२१ । सावदा (ता.रावेर) येथील पुरातन खंडोबा देवस्थाना (मंदिर)च्या सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन रविवार दि.२४ रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते संपन्न झाले.

सावदा येथे पुरातन काळापासून खंडोबा देव, म्हाळसा व बानु देवी यांचे मंदिर आहे. परिसरातील हजारो लोकांचे ते कुलदैवत सुद्धा आहे. याठिकाणी दरवर्षी चंपाषष्ठीला मोठी यात्रा भरते व १२ गाड्या देखील ओढल्या जातात. या ठिकाणी नवस फेडण्यासाठी तसेच दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. या ठिकाणी सभामंडप नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत होती. दरम्यान ही बाब आमदार चंद्रकांत पाटील यांच्या लक्षात आणून दिल्याने त्यांनी या ठिकाणी सभामंडप उभारण्यात यावा, अशी मागणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती व खंडेराव मंदिर संस्थान करिता सभामंडप निधी मंजूर करून घेतला होता. रविवार दि.२४ रोजी आठवडे बाजारातील खंडोबा देवस्थान येथे सभामंडपाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील याचे हस्ते करण्यात आले.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे यांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी नगराध्यक्षा अनिता येवले, नगरसेवक राजेंद्र चौधरी, फिरोज खान पठाण, शिवसेना उपतालुका प्रमुख धनंजय चौधरी, तालुका उपाध्यक्ष योगीराज पाटील, शिवसेना शहरप्रमुख सुजत परदेशी, भरत नेहते, शाम पाटील, शरद भारंबे, राहुल पवार, नंदू पाटील, स्वामीनारायण मंदिरातील स्वामी धर्म प्रसाद दासजी, रावेरचे माजी नगराध्यक्ष महाजन, सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार यांसह भक्तगण उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज