fbpx

भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती जामनेर तालुकाध्यक्ष पदी गजानन तायडे

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२१ । अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जळगाव जिल्ह्यात संघटन जोरदारपणे मजबूत होत असून आज जामनेर तालुका कार्यकारणी जाहीर व नियुक्ती करण्यात आली.

राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडपुरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने एरंडोल विभाग प्रमुख जितेंद्र वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली जामनेरच्या तालुकाध्यक्ष पदी गजानन तायडे यांची नियुक्ती करण्यात आली.

गजानन तायडे हे एम.ए.बी.एड. शिक्षित आहेत. तसेच पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची जामनेर तालुक्यात ओळख आहे.

संघटनेमार्फत जनतेची, गोरगरिबांची कामे होणेस तसेच अन्याय अत्याचाराच्या विरोधात ते कायम प्रयत्नशील असतील याची शाश्वती त्यांनी दिली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज