बीएचआर घोटाळा : सूरज झंवरला पुणे सोडून महाराष्ट्रात येण्याची परवानगी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२१ । राज्यभर गाजलेल्या बीएचआर घोटाळ्यातील मास्टर माईंड सुनील झंवरचा मुलगा सूरज याला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दीड महिन्यांपूर्वी अटक केली होती. दरम्यान, त्याला न्यायालयाने जामीन दिला आहे.

महाराष्ट्रात न थांबण्याची अट घालण्यात आली होती. यावर सूरज झंवर याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर सुनावणी झाली. सुरज याला पुणे जिल्हा सोडून महाराष्ट्रात प्रवेश करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिली. त्यामुळे आता तो पुणे सोडून कोणत्याही शहरात येऊन राहू शकतो.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -