बीएचआर प्रकरण : आज पुन्हा काही दिग्गज, दलाल अडकण्याची शक्यता

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२१ । राज्यभर गाजत असलेल्या बीएचआर घोटाळाप्रकरणी काही दिवसापूर्वी १२ दिग्गजांना अटक झाली होती. गुरुवारी तीन तपास पथके राज्यात तपासाकामी बाहेर पडले असल्याची माहिती प्राप्त झाली असून पुन्हा काही दिग्गज अडकण्याची शक्यता आहे.

बीएचआर पतसंस्थेत झालेल्या आर्थिक घोटाळ्यात ठेवीदारांकडून तीस टक्के प्रमाणे ठेवींच्या पावत्या घेऊन आपली कर्जफेड करणाऱ्या बारा जणांना तपास पथकाने पंधरा दिवसापूर्वी राज्यभरातून अटक केली होती. जळगाव शहरातील देखील दिग्गजांचा त्यात समावेश होता. सध्या सर्व संशयित न्यायालयीन कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, जामिनासाठी अर्ज केलेल्या संशयितांच्या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. बीएचआरची तीन तपास पथके आज पुन्हा राज्यात तपासाकामी बाहेर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बीएचआरमध्ये अनेकांनी आपले हात साफ करून घेतले असून ठेवीदारांच्या पैशावर मौज केली आहे. ठेवीदारांना गंडविण्यात काही दलालांनी मध्यस्थी करून कमिशन देखील खाल्ले आहे. बीएचआरच्या पुढील टप्प्यात काही दिग्गज आणि दलाल असून त्यांना देखील चौकशीकामी ताब्यात घेतले जाईल अशी शक्यता आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज