fbpx

Big Breaking : बीएचआर कारवाईनंतर शरद पवार – एकनाथराव खडसे भेटीने खळबळ

Big Breaking : बीएचआर कारवाईनंतर शरद पवार – एकनाथराव खडसे भेटीने खळबळ

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२१ । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी मुंबई येथे भेट घेतली. जळगाव जिल्ह्यात माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्या समर्थकांवर बीएचआरकडून झालेली कारवाई आणि खडसेंकडून घेण्यात आलेली भेट यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

mi advt

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून भेट घेण्याचे सत्र गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतल्यानंतर दोन दिवसापूर्वी मंत्री जयंत पाटील यांनी देखील खडसे यांची भेट घेतली होती. दोन्ही दिग्गजांच्या भेटीनंतर आज मुंबईतील निवासस्थानी एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची भेट घेतली. प्रसंगी चाळीसगाव येथील कैलास सूर्यवंशी देखील उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यात आणि राज्यात बीएचआर प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने आमदार गिरीश महाजन व आमदार राजूमामा भोळे यांच्या समर्थकांना ताब्यात घेऊन अटक केली. एकीकडे ही कारवाई होत असताना दुसरीकडे खडसे-पवार भेट झाल्याने राजकीय क्षेत्रात विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. जळगाव जिल्ह्यातील एक आमदार देखील बीएचआर प्रकरणात अडकणार असल्याची चर्चा असून ते सध्या नॉट रीचेबल असल्याचे कळते. खडसे यांनी घेतलेल्या या भेटीतील नेमके गौडबंगाल काय? असा प्रश्न राजकीय गोटातून उपस्थित होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज