fbpx

बीएचआरप्रकरणी आ.चंदूभाई पटेल यांच्या अटकेसाठी प्रयत्न

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२१ । बीएचआर घोटाळ्याप्रकरणी एका बड्या नेत्याला अटक होणार असल्याची चर्चा होती. दरम्यान, विधान परिषद आमदार चंदुभाई पटेल यांच्या अटकेसाठी आर्थिक गुन्हे शाखा पुणे युद्धपातळीवर प्रयत्न करीत असून आ.पटेल यांचा शोध सुरू असल्याचे समजते. आ.चंदूभाई पटेल यांच्यावर पुणे आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा देखील दाखल केल्याचे समजते.

बीएचआरप्रकरणी राज्यभरात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाच दिवशी धरपकड केली. जळगावात एकाच दिवशी आर्थिक गुन्हे शाखेने भागवत भंगाळे, संजय तोतला व इतर आरोपी यांना अचानक येऊन ताब्यात घेतले. त्यादिवशी विधान परिषद आमदार चंदूभाई पटेल यांची देखील चौकशी केली जाणार होती मात्र ते इंदोरला असल्याचे समजले. एक पथक इंदोर येथेही गेले होते मात्र आ.पटेल मिळून आले नाही. काही दिवसांनी पथक पुन्हा इंदोरला गेले असता मुख्य अवसायक जितेंद्र कंडारे पथकाला सापडला. गेल्या काही दिवसापासून आ.चंदूभाई पटेल हे नॉट रीचेबल असून ते शिरपूरपासून ते अंडरग्राउंड असल्याचे समजते. पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक त्यांचा शोध घेत असल्याचे वृत्त असून लवकरच ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज