बीएचआर प्रकरण : सुनील झंवरला ९ दिवसाची पोलीस कोठडी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२१ । बीएचआर पतसंस्था घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सुनील झंवरला मंगळवारी नाशिक येथून अटक करण्यात आली होती. बुधवारी झंवरला पुणे न्यायालयात हजर केले असता त्याला ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बीएचआर प्रकरणातील मुख्य संशयीत सुनील झंवर व त्याच्या फर्मच्या नावे बेकायदेशीररित्या वर्ग करून पूर्ण मोबदला न देता ठेवीदारांच्या पावत्या ३० टक्क्याने विकत घेऊन त्यांच्या ७० टक्के रकमेचा व संस्थेच्या मालमत्तेचा अपहार केल्याचा आरोप आहे. गेल्या ९ महिन्यांपासून फरार असलेल्या झंवरला मंगळवारी नाशिक येथे अटक करण्यात आली होती.

आज झंवरला न्यायालयात हजर केल्यानंतर विशेष सरकारी वकील ऍड. प्रवीण चव्हाण यांनी झंवरला जास्तीत जास्त दिवसांची पोलीस कोठडी मिळावी म्हणून जोरदार युक्तिवाद केला. त्यावर न्या. एन. एम. गोसावी यांनी झंवरला ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -