fbpx

Big Breaking : बीएचआर प्रकरण : सुनील झंवर नाशिकला अटकेत

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२१ । बीएचआर पतसंस्था प्रकरणी फरार असलेले मुख्य संशयित सुनील झंवर यांना नाशिकमध्ये अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर सापळा रचून अटक केली आहे.

बीएचआर पतसंस्था घोटाळ्याप्रकरणी फरार असलेले मुख्य संशयीत सुनील झंवर यांना नाशिकमध्ये अटक करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, याबाबत अधिक माहिती अजून समोर आली नसून पोलिसांकडून लवकरच माहिती देण्यात येईल. झंवर यांना अटक होताच इतरांचे धाबे मात्र दणाणले आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज